ताज्या बातम्यापालघर

स्टोन क्रशरच्या प्रदूषणाने बोईसरकर त्रस्त; बोईसर हद्दीत सर्व नियम धाब्यावर बसवून बेसुमार क्रशर धुराळा…

|परिसरात रेल्वेच्या कामाकरीता बला मोठा क्रशर उभारण्यात आला असून हा क्रशर अनधिकृत असून याला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याची पुढे आले आहे…|
|दिवसरात्र या भागातून धुळीचे लोट उडत असतात. रात्रीच्या सुमारास तर या परिसरात प्रचंड धुळीचे ढग तयार होतात, कधी कधी तर यामुळे समोरचा माणूस दिसत नाही, असे येथील वावरणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या परिसरात उघडय़ावर काम करणाऱ्या कामगारांच्या तर रोज मूठभर तरी धुरळा पोटात जात असण्याची शक्यता आहे तर घरात धुळीचे लोट जात असल्यामुळे वाढत्या उष्णतेत देखील खिडक्या बंद ठेवावी लागत आहे. |

पालघर:- (प्रतिनिधी):- सुशांत संखे

बोईसर | बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील काटकर पाडा येथे रेल्वेचे काम जोरात सुरू असून तेथील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बोईसर रेल्वे स्थानक पासुन बी.ए.आर.सी. जुने रेल्वे यार्डच्या कामाला सुरुवात झालेली असून मोठ्या प्रमाणात माती भरावं केला जात आहे तर या कामाच्या बांधकामासाठी स्टोन क्रशर बसविण्यात आलेली असून एकूणच या सर्व धुराळाचा भर पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

पर्यावरण विभागाकडून परवानगी नसलेल्या या प्रकल्पाला शासकीय यंत्रणेनेचा कुठलाही अंकुश नसताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून दिवसरात्र या भागात क्रशर सुरू असून यामुळे उडणाऱ्या धुरळय़ाने जवळच्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. क्रशर हे राजकीय बडय़ा धेंडांच्या आणि उद्योजकांच्या मालकीचे असल्यामुळे या माफियांची प्रचंड मुजोरी आहे. त्यामुळे ते कोणालाही जुमानत नाहीत.या परिसरात क्रशर अनधिकृत असून त्यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याचे पुढे आले आहे. या परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नियमबाह्य क्रशर चालत असल्याचे दिसून येत आहे. क्रशरचालकांला प्रदुषण होणार नाही याबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच धुरळा उडू नये म्हणून सतत पाण्याची फवारणी केली जाते, परंतु धुराळा उडून प्रदूषण होणार नाही याची खबरदारी याठिकाणी घेण्यात आलेली दिसून येत नाही. तर बोईसर ग्रामपंचायत हद्दीत हे कृत्य सुरू असताना पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारची परवानगी या ठिकाणी घेताना दिसून येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button