पटेल सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालूक्यातील सर्व शाळा कॅालेजला त्यांनी एक तक्ता भेट. एक हजार प्रति स्वखर्चाने तयार करून प्रत्येकाला स्वत भेटून दिले.

तुळजापूर (प्रतिनिधी):- तुळजापूरातील जि.प. शाळा क्रिडाशिक्षक म्हणून पटेल सर वय 78 वर्ष यांनी संपुर्ण आयुष्य मैदानावर खेळाडू निर्माण करण्यात समर्पित केले. यांनी ग्रामीण भागातील हजारो खेळाडूंना राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू त्यांनी निर्माण केले. तुळजापुर तालूका क्रीडांगणावर आज ही दिवसभरातील पाच सहा तास ते कार्यरत असतात. सातत्याने खेळाचे नवनविन उपक्रम ते करीत असतात. आज महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली. औचित्य सुध्दा विशेष होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक सुदंर तक्ता केलेला आहे. या तक्तामध्ये आरोग्य आणि खेळा संदर्भातील उपयुक्त माहीती आहे. तालूक्यातील सर्व शाळा कॅालेजला त्यांनी हा तक्ता भेट दिली आहे.
एक हजार प्रति स्वखर्चाने तयार करून प्रत्येकाला स्वत भेटून त्याचे महत्व सांगून देत आहेत. अशा ध्येयवेडया शिक्षकाला यशवंत परिवाराच्या वतिने मानाचा मुजरा. याप्रसंगी प्राचार्य डॅा. गायकवाड सर, माजी प्राचार्य डॅा. शित्रे सर, डॅा. जेठीथोर सर, पटेल सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.