पवनचक्की ठेकेदाराची फिल्मी स्टाईलने मेसाई जवळग्यात दहशत पवनचक्की कंपन्यावर कारवाई होणार का ? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का ?

तुळजापूर :- (प्रतिनिधी) तुळजापूर:- तालुक्यात रिन्यू कंपनीचे पवनचक्की उभारण्याचे काम चालू आहे सध्या हे काम मेसाई जवळगा या गावात चालू आहे पवनचक्की उभारण्यासाठी येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीत दिल्या आहेत पण काही शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी ताब्यात घेण्याचे काम ही कंपनी करत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. तर जमिनी न देणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी पवनचक्की ठेकेदाराची दादागिरी चालू आहे. शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी 15 ते 20 काळ्या रंगाच्या स्कार्पियो मध्ये 40 ते 50 बॉन्सर आणि गुंड घेऊन ठेकेदार चित्रपटात शोभेल या पद्धतीने गावात दाखल झाला. फिल्मी स्टाईलने दहशत माजवत असताना शेतकऱ्यांनी विरोध केला असता शेतकऱ्यांच्या वावरात पिकाची नासाडी करत वाहने शेतात नेण्यात आली. गावातील नागरिक महिला आणि लहान मुले रस्त्यावर उतरले होते. गावातील नागरिकांनी भाजपचे नेते तथा प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांना फोन केला असता रोचकरी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी ठेकेदाराला जाब विचारून पोलिसांना फोन केला असता पोलिसाकडून शुन्य प्रतिसाद मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली तर पवनचक्की ठेकेदाराचे पोलिसांना हप्ते असून ते जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले तर आपण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना फोनवरून सदरील घटने बाबत कळविले असून यापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. त्यावर देखील कुठलीही कारवाई झाली नसल्याचे रोचकरी यांनी सांगितले. विशाल रोचकरी यांच्या समवेत मेसाई जवळगा ग्रामस्थांनी एकत्र येऊन पवनचक्की ठेकेदाराचा हा डाव हाणून पाडला आणि पवन चक्की ठेकेदाराला गावातून गुंड आणि बाऊन्सर घेऊन वापस जावे लागले.