आपल धाराशिवताज्या बातम्या
सीईओ डॉ.मैनक घोष यांच्याकडे* *जिल्हाधिकारी पदाचा पदभार

धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे हे २ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे प्रशिक्षणासाठी जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार डॉ.ओंबासे यांनी आज २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्याकडे सोपविला.