ताज्या बातम्यापालघर
पदपथांवर गुटका टपऱ्यांचा पसारा..

पालघर:- (प्रतिनिधी):- |बोईसर शहरातील विविध ठिकाणच्या पदपथ व रस्ते या ठिकाणी टपऱ्यांचे अतिक्रमण झाले आहे. दिवसेंदिवस या टपऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने या टपऱ्या रस्ते व पदपथ गिळंकृत करू लागल्या आहेत.|
लक्षात घेता मागील काही वर्षांत शहरातील अरुंद रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. पण रुंदीकरण केलेले रस्ते या टपरीधारकांनी व्यापले आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.
|जिल्हा सह संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू असून आचारसंहिता संपल्यावर तात्काळ अशा बेकायदेशीर अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली जाईल.
आनंद धोडी- सरावली ग्रामपंचायत सरपंच|