सहज ध्यान साधनेने मानवाची आध्यत्मिक ऊंची वाढते.रवींद्र बालगूंदे अहमदनगर जिल्हा सहजयोग सेमिनार अहमदनगर येथे संपन्न

नगर – अहमदनगर :- (प्रतिनिधी):- जिल्हा सहजयोग समिती च्या वतीने रवींद्र अहमदनगर जिल्ह्यातील सहजयोग्यासाठी जिल्हा सेमिनार महालक्ष्मी लॉन, नेप्ती रोड येथे संपन्न झाले. या वेळी प्रमुख व्याख्याते कोल्हापूर येथील रवींद्र बालगूंदे, येवतमाळ येथील हिम्मत मडावी, नाशिक येथील आशिष उमप व डॉ. मोनालीताई उमप जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा, जेष्ठ सहजयोगी नामदेव राहाणे व अशोकराव कोतकर यांच्या हस्ते प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे चरणावर फुले अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांस सुरुवात करण्यात आली.
या वेळी रवींद्र बालगूंदे यांनी सहजयोग ध्यानाची गहनता, निर्वीचारिता व निर्विकल्प स्थिती बाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले की सहजयोग हा आंतरराष्ट्रीय योग असून जगातील 140 देशा पेक्षा जास्त देशातील नागरिक ही ध्यान साधना करीत असून या ध्यान साधने मुळे आंतरिक समाधान प्राप्त होऊन मानसिक ताण तणावातून अनेक जणांना मुक्तता मिळाली आहे. अनेक जन निर्व्यसनी झाले असून या सहज ध्यान साधनेने अनेकांची आध्यत्मिक ऊंची वाढली आहे.
या वेळी हिम्मत मडावी सर यांनी सहजयोग्यांची ओळख व सहज्योगातील प्रोटोकॉल बद्दल विस्तृत माहिती दिली. तर आशिष उमप यांनी सहजयोग प्रचार प्रसार बाबत विस्तृत माहिती देऊन सहजयोग प्रचार प्रसार लहान मुलापासून ते वयोवृद्धा पर्यंत सर्वासाठी हा योग उपयुक्त असून शालेय जीवनातील मुलांची स्मरणशक्ती वाढून अभ्यासात प्रगती होते तर तरुण मुलांची व्यसनातून मुक्तता होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होते तर वयोवृद्धाची आरोग्यात सुधारणा होते. या साठी हा योग सर्व घटकासाठी उपयुक्त आहे. या वेळी डॉ. मोनाली उमप यांनी महिला शक्तीचे सहजयोगातील महत्व पटवून दिले.
या वेळी कार्यक्रम सुरु होण्याअगोदर दिशा काळे व गणेश बैरागी यांनी भजने म्हणून सर्व सहजयोग्याना मंत्रमुग्ध केले. आलेल्या पाहुण्यांचे अहमदनगर जिल्हा सहजयोग समितीचे वतीने प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेचे स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ देऊन स्वागत जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी केले, प्रास्ताविक जितेंद्र रसाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मेजर कुंडलिक ढाकणे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूर्वजा बोज्जा व कु. सुश्मिता शिंदे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी श्रीमंत किनकर, चंद्रकांत रोहकले, राहुल सातपुते, लक्ष्मण अंदे, गणेश कोडम, अविनाश महाजन, बालाजी मेरगू, रवींद्र आगारकर, शेवाळे, राजू द्यावनपेल्ली, सुहास रच्चा, विनायक जोग, मनोज बनसोडे व अनंत रोहकले व युवशक्तींनी व सहजयोगी महिलांनी परिश्रम घेतले.