आपल धाराशिवताज्या बातम्या

अवैध मद्य विरोधी कारवाई

धराशिव:- (प्रतिनिधी):- उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-ज्ञानोबा मारुती गायकवाड, वय 47 वर्षे, विजयागाई मारुती सुर्यवंशी, वय 45 वर्षे, रा. मुळजरोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.18.06.2024 रोजी 13.00 वा. सु. आण्णाभाउ साठे चौक मार्केट यार्ड जवळ उमरगा येथे अंदाजे 53,600 ₹ किंमतीची 60 लि. गावठी दारु सह ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके 0153 अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

मुरुम पोलीस ठाणे: आरोपी नामे-सुरज धनराज शिंदे, वय 32 वर्षे, संभाजी नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.18.06.2024 रोजी 19.15 वा. सु. मुरुम ते अक्कलकोट जाणारे रोडचे बाजूस डेक्कन धाबा येथे अंदाजे 1,210 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: आरोपी नामे-अरुण नागनाथ विधाते, वय 65 वर्षे, हे दि.18.06.2024 रोजी 18.30 वा. सु. मुरुम ते शेकापुर गावामध्ये समाज मंदीराचे पाठीमागे अंदाजे 800 ₹ किंमतीची 10 लि. गावइी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

येरमाळा पोलीस ठाणे: आरोपी नामे-शंकर राजाभाउ शिंदे, वय 32 वर्षे, हे दि.18.06.2024 रोजी 18.00 वा. सु. वाघोली येथे आपल्या राहत्या घराजवळ अंदाजे 5,670 ₹ किंमतीची 63 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button