वंजारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न… एस वी पॉवर हिटर्स विजेता तर पाम टायटन्स उपविजेता

पालघर :-(प्रतिनिधी):- [ सहा षटकांत ७३ धावांची खेळी करणाऱ्या पाम टायटन्स संघाला पराभूत करताना एस वी पॉवर हीटर्स संघाचे कर्णधार दिपेश संखे यांनी चाणक्य नीती वापरत अगधी सहज ७३ धावांचा लक्ष पार करून संघ मालक श्याम संखे यांना एक उत्कृष्ट चषक मिळवून दिलेला आहे.सुशांत संखे
पालघर ! सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सहावी वंजारी प्रिमियर लिग या क्रिकेट सामन्यांचे दिनांक २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी तारापूर विद्या मंदिर या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय चुरशीच्या स्पर्धेत विजेता संघ एस.वी.पॉवर हिटर्स अंतिम विजेता तर उपविजेता पद पाम टायटन्स या संघाने पटकावले आहे.
वंजारी समाजातील क्रीडा प्रेमींना एकत्र आणून त्यांच्यातील कौशल्य दाखवून देण्यासाठी वंजारी प्रिमियर लिग फाउंडेशन स्थापन करण्यात आलेले असून या खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या फाउंडेशन मार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण दहा संघाने सहभाग घेतला होता त्यामध्ये एस.वी.पॉवर हिटर्स, स्वरा इंडियन्स, जि.डी.पी वॉरियर्स, पाम टायटन्स, सिर्फ एन्जॉय रॉयल्स, कुंभवली फायटर्स, मासवण टायगर्स, निर्धार ११, रॉयल बालाजी, युवा स्ट्राईकर्स या संघांनी सहभाग नोंदविलेला असून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम पारितोषीक पटकाविणाऱ्या एस.वी.पॉवर हिटर्स संघाचे कर्णधार दिपेश संखे यांना रूपये एक लाख पंचवीस हजार रूपयांचा धनादेश व उत्कृष्ट चषक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेता पद पटकाविणाऱ्या पाम टायटन्स संघाचे कर्णधार ….. यांना रूपये अठ्ठायशी हजार रूपयांचा रोख पारितोषिक उत्कृष्ट चषक देऊन गौरविण्यात आले तसेच व तृतीय पारितोषिक मासवण टायगर्स, चतुर्थ पारितोषिक जी.डी.पी वॉरियर्स यांना देखील रूपये पन्नास हजार रूपयांचा रोख पारितोषिक व उत्कृष्ट चषक देऊन गौरविण्यात आले
या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविलेली असून प्रमुख पाहुणे म्हणून वंजारी समाजातील प्रथम आय एस अधिकारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ कश्मिरा संखे, माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे – उद्योजक उदय पाटील, उद्योजक दिलिप पिंपळे, उद्योजक मुकेश पाटील, उद्योजक राजेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते कुंदन संखे , जि प माजी कृषी सभापती अशोक वडे, जि. प माजी उपाध्यक्ष सचिन पाटील , पंचायत समिती माजी सदस्य जितेंद्र संखे, पालघर ठाणे वंजारी समाज हितर्वधक मंडळाचे अध्यक्ष नरोत्तम पाटील, माजी अध्यक्ष रामू संखे , सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच निलम रमाकांत संखे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत संखे , संतोष संखे, नगरसेवक चंद्रशेखर वडे , वेट लिफ्टींग सुवर्णपदक पटकविणाऱ्या रिया पिंपळे -एम एम ए सुवर्णपदक पटकविणाऱ्या अंजेल यतीन पाटील , जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेला वेंदात वडे, समाजातील विविध ग्रामपंचायतीत सरपंच पद भूषवीणारे सरपंच कुणाल पाटील, सरपंच धीरज संखे , सरपंच पिंकी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते . यावेळी विजेता संघाना मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक संघ एस.वी.पॉवर हीटर्स यांना १,२५,०००/-, द्वितीय पारितोषिक पाम टायटन्स संघाला ८८,०००/-, तृतीय पारितोषिक मासवण टायगर्स ५०,०००/- , चतुर्थ पारितोषिक जी.डी.पी वॉरियर्स
५०,०००/- या चारही संघाना सुंदर चषक व रोख रक्कम देण्यात आले असुन या भव्य कार्यक्रमात बहुसंख्य लोक उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन वंजारी प्रमीयर लिग फाउंडेशन मार्फत करण्यात आलेले असून या तीन दिवसीय सामन्यांचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब चॅनल वरून प्रसारित करण्यात आलेले असून या तीन दिवसांत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंचा विमा देखील उतरविण्यात आलेला होता. या स्पर्धेत पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, वाढत्या उष्णतेचा परिणाम खेळाडू तसेच प्रत्यक्षदर्शींना होऊ नये म्हणून खास मंडप व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. या तीन दिवसीय सामन्यात दुखापत झालेल्या खेळाडूंकरता डॉ जितेंद्र पाटील यांच्या साई लिला रूग्णालयात कडून प्राथमिक उपचार केंद्र देखील उभारण्यात आले होते.
या तीन दिवसीय स्पर्धेत मालिकावीर अखिल संखे ,उकृष्ट फलंदाज – तुषार संखे, उत्कृष्ट गोलंदाज – राहुल पिंपळे यांनी पटकाविलेले असून फाउंडेशन मार्फत यांना उत्कृष्ट चषक देऊन गौरविण्यात आले.