आपल धाराशिवताज्या बातम्या

राजेनिंबाळकराच्या घरातील महिला शक्ती मैदानात -कैलास पाटील यांच्या पत्नी देखील प्रचारात पुढे

धाराशिव :- (प्रतिनिधी):- ता.1- उमेदवार असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या परिवारातील सर्वच महिलांनी आपल्या सदस्यास निवडुन आणण्यासाठी प्रचाराच्या मैदानात उडी घेतल्याचे दिसत आहे. कैलास पाटील यांच्या पत्नी यांनी देखील गावा-गावात जाऊन प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

मतदारसंघात एका बाजुला ओमराजे निंबाळकर यांच्या सभांचा धुरळा उडत आहे तर दुसरीकडे त्यांच्या परिवारातील महिला देखील डोअर टु डोअर फिरुन मतदान करण्याचे अवाहन करताना दिसत आहेत. त्यामध्ये पत्नी संयोजिनीराजे, आई आनंदीदेवी, बहिण डॉ. सईदेवी, वहिणी देविका यांनी प्रचारात रंग भरल्याचे दिसुन येत आहे. त्याना महिला वर्गातुनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासदार यांच्या घरातील सदस्य पाहण्यासाठी गावात देखील उत्सुकता पाहयला मिळत आहे, त्याना पाहुन त्या आपल्याच घरातील सदस्य असल्याची भावना मतदार व्यक्त करताना दिसतात. गावागावात जाऊन त्यानी आपल्या सदस्याची कामे सांगायला ते विसरत नाहीत. तेव्हा अनेकाकडुन खासदारानी गावासाठी काय केले फोनवरुन कसे काम केले हे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कैलास पाटील यांच्या पत्नी शुभांगी यानी सुध्दा कळंब – धाराशिव तालुका पिंजुन काढला आहे. गावागावात त्यांचे अत्यंत उत्साहाने स्वागत होत असुन आमदाराच्या पत्नी असल्या तरी त्यांच्यामध्ये कुठेही ती भावना दिसत नाही अशा प्रतिक्रिया जनतेतुन व्यक्त होत आहे. त्या देखील अगदी सामान्याच्या घरात जाऊन त्यांचा पाहुणचार स्विकारत असल्याने त्याचे अप्रुप दिसत आहे. या सर्वच महिलांच्या अशा साध्या वागण्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. महिलाशक्ती ही खंबीरपणे आपल्या माणसाच्या मागे उभा राहते तेव्हा त्याचा किती चांगला परिणाम दिसतो याचे हे अत्यंत चांगले उदाहरण आहे. विशेष म्हणजे यातील एकही महिला विरोधी उमेदवाराबद्दल कोणी बोलत असेल त्यावर एकाही शब्दाची प्रतिक्रिया देत नाहीत. त्यावरुनच त्यांच्या संस्काराबद्दल जाहीर चर्चा होऊ लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button