अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे यांच्या हस्ते पौष्टिक खाद्याचे वाटप दि.२३ जुलै रोजी करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस अजित पर्व म्हणून जिल्हाभरात साजरा करण्यात येत आहे. धाराशिव शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक २२ मधील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू व बिस्किटांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव – कळंब विधानसभेच्यावतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभागाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, राम सातपुते, बलभीम ओव्हाळ, अक्षय मुंडे, अक्षय तावस्कर, सुनित ओव्हाळ, प्रताप राऊत गणेश शेळके, विक्रांत जोशी, सचिन राऊत, रुपेश यादव यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक अरविंद जाधव, सहशिक्षक प्रेमलता जांभळे, सेविका चमेली जाधव आदी उपस्थित होते.