आपल धाराशिवताज्या बातम्या

विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसकडून दावा करणार ॲड धिरज पाटील

तुळजापूर (प्रतिनिधी) तुळजापूर आमचे कुंटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ट राहिल्याने आगामी विधानसभा निवडणुकसाठी क़ॉँग्रेस पक्षाकड्डन मी उमेदवारी मागणार असल्याची माहीती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड. धिरज कदम पाटील यांनी पत्रकार परिषद घेवुन माहिती दिली. तसेच यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले कि, मी यापुर्वी उमेदवारी मागितली होती. तेव्हा पक्षाने मला जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. मी आजपर्यत एनएसयुआय नंतर युवक काँग्रेस अध्यक्ष नंतर जिल्हा सरचिटणीस नंतर आता जिल्हाध्यक्ष पदावर काम केले आहे. मी दोनदा जिल्हा परिषद सदस्यपदी निवडुन आलो असुन जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी काम केले आहे. माझा उमेदवारी बाबतीत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कामाला लागा असे मला सांगितले आहे. मी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळवुन देण्यासाठी काम केले आहे. सध्या मी गावोगाव जावुन मतदारांच्या गाठीभेटी घेवुन 33 गावांना भेटी दिल्या आहेत. तुळजापूर तालुका कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असुन महाविकास आघाडीत तो काँग्रेसकडेच राहणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केले. तसेच भाजपकड़े गेलेला क़ॉग्रेसचा बालेकिल्ला पुनश्च परत घेणार असल्याचे यावेळी सांगितले, पक्षाने मला संधी दायावी त्याचे मी सोने करीन असे यावेळी. लोकसभेस खासदार ओमराजे निंबाळकर नी निवडून येण्यास महागाई, मतदारांशी संपर्क, पक्षांतर भ्रष्टाचार, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव हे कारणे असल्याचे यावेळी म्हणाले. तसेच त्या समयी उपस्थित अमोल कुतवळ, संजय कदम उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button