नूतन प्राथमिक विद्यामंदीर, धाराशिव मध्ये श्री.सुधीर ( आण्णा ) पाटील यांच्या वतीने 10,000 वह्यांचे वाटप.

धाराशिव:- (प्रतिनिधी):- आज धाराशिव येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर मध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.सुधीर अण्णा पाटील यांच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीच्या 1 600 विद्यार्थ्यांसाठी मोफत 10,000 वह्यांचे वाटप करण्यात आले , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ.प्रेमाताई पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.सचिन ओंबासे यांच्या सौभाग्यवती सौ. अस्मिता ओंबासे मॅडम, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आदित्य भैय्या पाटील , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रदिपकुमार गोरे व श्री. शिवकुमार लगाडे हे होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यां वह्या वाटप करण्यात आले ,यावेळी बोलताना सौ.प्रेमाताई पाटील यांनी श्री. सुधीर (आण्णा) पाटील साहेब यांच्या शैक्षणिक व सामाजिक व राजकीय कार्याची माहिती उपस्थितांना दिली श्री. सुधीर ( आण्णा )पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी यांची शेकडो मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली असून ते समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने घेत असतात. नूतन प्राथमिक विद्यामंदीर शाळेमधील विद्यार्थांची मागील दोन वर्षांतील वाढलेली शैक्षणिक गुणवत्ता पाहून श्री. सुधीर (आण्णा) पाटील यांनी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्याचा मानस केला होता त्यासाठी त्यांनी दोन लक्ष रूपये किंमतीच्या 10,000 वह्या नूतन प्राथमिक विद्यामंदीर शाळेस भेट दिल्या आहेत व यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री .संतोष माळी यांनी केले कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.