तुळजापूर तालुक्यात वीट भट्ट्या बेकायदेशीर सुरू याकडे कोण लक्ष देणार ?

तुळजापूर :- (प्रतिनिधी) :तुळजापूर तालुक्यातील प्रदर्शन महामंडळ लातूर यांचा परवाना नसताना तसेच तहसील कार्यालय तुळजापूर यांनी कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी दिली नसताना वीट भट्ट्या बेकायदेशीर सुरू असून तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याबाबत या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने 20 जून रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिले आहे .तुळजापूर तालुक्यातील प्रदर्शन महामंडळ यांची परवानगी नसताना वीटभत्या चालकाने शासनाने दिलेल्या नियमानुसार कोणतेही वीट भट्टी चालू परवाना घेतला नसून सदर वीटभट्टी मुळे त्या परिसरात जमिनी नापीक होत असून सदर वीटभट्टी चालकाकडून कायदेशीर परवाना न घेता खुल्या वीटभट्टी चालक अवैद्यरित्या व्यवसाय करत असून शासनाची लाखो रुपयाचा कर व शेतकऱ्याची शेतीचे आर्थिक नुकसान केले असून संबंधित वीटभट्टी चालकांचे परवाने तपासून योग्य ती चौकशी करून कारवाई करावी म्हणून तहसील कार्यालय येथे अनेकदा निवेदन देऊनही तसेच एक दिवसाचे अर्धनग्न आंदोलन करूनही प्रशासनाने मुदत दिली होती परंतु साधारणतः नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन पण संबंधित तहसील कार्यालय वीटभट्टी चालकांना अभय देत असल्याचं दिसून येत असून अद्यापही तहसील कडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तसेच संबंधित तहसील कार्यालय हे प्रदर्शन महामंडळ लातूर यांना कारवाईचे आदेश असल्याचे सांगत कारण पुढे करत मौन व्रत धारण केले आहे तर प्रदर्शन महामंडळ लातूर हे सदर कारवाईचे आदेश हे संबंधित तहसीलदार यांच्याकडे असल्याचं सांगून त्या प्रकारचं पत्रव्यवहार संबंधित तक्रारदार यांच्याकडे करत असल्यास दिसून येत आहे .
संबंधित तहसील व प्रदूषण महामंडळ लातूर हे संबंधित वीटभट्टी चालकास कारवाई करण्यासंदर्भात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चिरीमिरी घेतात का काय असा प्रश्न निर्माण झाला असून एक वर्षापासून निवेदन देऊनही कारवाही का केली जात नाही का वीटभट्टी चालकांना अभय दिला जातो असा प्रश्न निर्माण झाला असून या संदर्भातच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती हे दिनांक 20 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करून संबंधित प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवणार असल्याचं जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे .