आपल धाराशिव

महापुरुषांच्या पुतळ्याजवळ वाढणारी गर्दी महापुरुषांच्या पुस्तकाजवळ आणणे गरजेचे – चंदनशिवे

धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) – पाच हजार वर्षांपासून दलित, बहुजन समाज अन्याय अत्याचार सहन करीत आला. त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. परंतू १४ एप्रिल १८९१ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाचा तळपता प्रज्ञा सूर्य उगवला. त्यांनीच सर्व अन्याय अत्याचार गाडून टाकण्याचे काम करीत सर्वानाच न्याय देण्याचे काम केले. त्यानंतर आंबेडकरी चळवळ मोठ्या जोमाने वाढली. मात्र आजकालची तरुण मंडळी चळवळीत दिसत नसून ते फेसबुक, व्हाट्स ॲप यावरती मग्न दिसत आहेत. त्यामुळे डिजिटल कट्टरता वाढलेली असून ही धार्मिक रंगांची चळवळ घातक आहे. प्रत्येकजण आपापल्या सोयीने भगवा, निळा,‌ पिवळा, हिरवा, लाल व इतर रंगांत शुभ सकाळ असा संदेश पाठवित आहेत. या माध्यमातून महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असून ती गर्दी महापुरुषांच्या पुस्तकाजवळ आणणे गरजेचे असल्याचे ठाम प्रतिपादन विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांनी दि.२२ मे रोजी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत पुरोगामी चळवळ आणि आजचा युवक या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जरिचंद सावंत उपस्थित होते.

पुढे बोलताना कवी चंदनशिवे म्हणाले की, वामनदादा कर्डक यांच्या विचाराशिवाय आंबेडकरी होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार जी माणसे जपतात व सांगतात, त्यांच्या घराची राख होते. तर जी माणसे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार विकतात त्यांच्या घराचे सोनं होते. मात्र राख झालेल्यांचाच इतिहास लिहिला जातो, सोनं झालेल्यांचि इतिहास लिहिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तर चळवळ ही राजकीय पुढारी किंवा पक्षामुळे जिवंत राहिली नसून ती शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले.‌
तर सध्या राजकारणी मंडळी व त्यांच्या नकली कारभारामुळे सर्वत्र नकली वातावरण असून या नकली वातावरणात चांगल्या लोकांना निराशेची झालर आली आहे. मात्र नकली वातावरणामध्ये फुले, शाहू, आंबेडकर व संविधान हे असली असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच माणसाने माणसात राहिले पाहिजे असे सांगत ते म्हणाले की, सध्या दोन भारत देश आहेत. एक देश खाल्लेले पचवायला व जिरवायला तर दुसरा उपाशी पोटीचा देश असून तो भाकरीच्या शोधात असल्याचे सांगत त्यांनी येथील सर्वसामान्यांना राजकारण्यांकडून कशा प्रकारे नागवले जात आहे ? यावर जळजळीत प्रहार केला. पॅंथरच्या काळात आंबेडकरी चळवळीत हंबरडा असल्याने ती जोमाने वाढली व फोफावली. मात्र त्यानंतरच्या काळात चळवळीत असणारा हंबरडा दिसत नसल्याने तो पुन्हा दिसला पाहिजे. त्यासाठी जुन्या लोकांनी खुर्च्या सोडायला पाहिजेत. तरच नवतरुण पुढे येतील असे सांगत महापुरुषांच्या जयंत्या साजरा करण्यासाठी महिलांच्या हाती सूत्रे सोपवावीत असे आवाहन त्यांनी केले.

सर्वच क्षेत्रात अध्यक्ष सर्व काही असल्यामुळे उपाध्यक्षांना काहीच किंमत नसते. असाच प्रकार राज्याच्या राजकारणात झाला असून उपमुख्यमंत्री असलेल्या मंडळींना पुन्हा कधीच मुख्यमंत्री होता येणार नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना लगावला. जोपर्यंत गावागावात कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जरिचंद सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी भाई उद्धवराव पाटील विचार मंचचे भाई धनंजय पाटील, मध्यवर्ती शिवजयंतीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सौरव बागल, अंजुमन सोसायटीचे फिरोज पल्ला, रमाई फाऊंडेशनचे पृथ्वीराज चिलवंत, शाहू नगर उत्सव अभिवादन समितीचे सौरव शिंगाडे, दादासाहेब शिंगाडे, कवयित्री भाग्यश्री केसकर, कवी पंडित कांबळे, व्ही एस गायकवाड, बाळासाहेब मस्के आदींना विचार मंचच्यावतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे सचिव प्रा महेंद्र चंदनशिवे, पंडित कांबळे, नागनाथ गोरसे, प्रा अंबादास कळासरे, मारोती पवार, अमोल गडबडे, बाबासाहेब जानराव, अभिमन्यू इंगळे, दीपक सरवदे, रोहिदास झेंडे, व्ही एस गायकवाड, चंद्रकांत मस्के, मिलिंद जानराव, दत्तात्रय लांडगे, मारुती अहिरे, हनुमंत गायकवाड, दीपक कांबळे, अनुरथ नागटिळक, बाळासाहेब वाघमारे, बाबासाहेब मनोहर, पंडित माने, सुमित कांबळे, विजय दनाने, श्रीकांत हावळे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा रवी सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे व उपस्थितांचे आभार प्रा अंबादास कळासरे यांनी मानले.
या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button