आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची तुळजापुरात ढोल ताशाच्या गजरात भव्य विजयी जल्लोष मिरवणूक

नळदुर्ग :-(प्रतिनिधी) दादासाहेब बनसोडे
महाराष्ट्र राज्यात महायुती ऐतिहासिक विजय झाला असून यामध्ये हा विजय खरं तर लाडक्या बहिणीचा लाडक्या भावाला भरघोस ” मत दान ” देऊन भरभरून आशीर्वाद दिला आहे .लाडक्या बहिणीनी दिल्या भावाला अंतःकरणाने अशिर्वाद नळदुर्ग शहरात फटाक्याची अतिषबाजी करत आनंद उत्सव करण्यात आला साजरा त्यामुळे महाराष्ट्र राज्यात परत महायुती सरकारला मोठ यश मिळाले आहे .
तुळजापूर तालुक्यात तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रामाणिक पणा मुळे व लोकांशी असलेला संवाद प्रेम मोह माया आणि तालुक्याचा विकास तालुक्या सह धाराशिव जिल्हयाच्या सर्वागिण विकासा साठी गेली अनेक वर्ष सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला ही बाजू भक्कम ठेऊन त्याच बरोबर आपुलकी ही भावना उराशी वाळवून लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांनी केलेल्या कामाचा लौकिक पणा समोर आल्यामुळे राणा पाटील हे ३६८७९ मताधिक्याने विजयी झाले आहेत विकास कामामध्ये महापुरुषाचे स्मारके , महत्वाचा पाणी प्रश्न , जलकुंभ, पाईप लाईन , मंदीर जीर्णोद्धार , रोजगार आसो तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्याचा वैभवशाली समृद्ध वारसा जोपासण्यासाठी ऐतिहासिक वाटचाल सुरू आसुन त्यांच्या विजया मुळे नळदुर्ग सह तुळजापूर व तुळजापूर मतदार संघां मध्ये विजयी उत्सव साजरा करण्यात येत आहे . याच बरोबर लाडकी बहीण योजना ही योजना भावासाठी सफल ठरली आसुन बहिणीने भावाला भरभरून आशीर्वाद दिला आहे त्यामुळे तुळजापूरची लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील हे मताधिक्याने विजयी झाल्यामुळे बहिणी सह भावाने सुद्धा गुलालाची उधळण करत पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला .यावेळी युवा नेते सुनील चव्हाण जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास गुरुजी कांबळे ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे , नळदुर्ग शहरातील भाजपाचे नेते सुशांत भूमकर भाजपाचे नेते तथा माजी नगरसेवक सुधीर हजारे गणेश सोनटक्के , अरुण लोखंडे , भाजपाचे संजय जाधव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे पत्रकार उत्तम बनजगोळे पत्रकार मित्र अमर भाळे पत्रकार शिवाजी नाईक विशाल डुकरे श्रमिक पोद्दार धिमाजी घुगे , बंडू पदाले सागर हजारे पांडु पुदाले ,रिपाईचे बाबासाहेब बनसोडे नळदुर्ग शहर अध्यक्ष मारुती खारवे सह हजारोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते निकाल जाहीर होताच तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची जीप मधून भव्य आशी विजयी जल्लोष मिरवणूक काढण्यात आली या मध्ये ढोल ताशा हलग्यांचा कडकडाट शोभची दारू गुलालाची व गुलाबाच्या फुलाची उधळण करत खूप मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली हि मिरवणूक तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर महाराषट्राचे अराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला दर्शन घेऊन
मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी तुळजापूर मतदार संघातील हाजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .