आपल धाराशिवताज्या बातम्या

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पशुपालकांनी गुरांच्या चाऱ्याबाबत दक्षता घ्यावी पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

धाराशिव दि.03(प्रतिनिधी)उन्हाळ्यात उष्णतेमुळे लागणा-या आगीपासून उपलब्ध चाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी वाळलेला चारा / कडव्याच्या गंजी जवळ कोणत्याही ज्वलनशील पदार्थाचा साठा करण्यात येवू नये.वाळलेला चारा / कडव्याच्या गंजी अथवा उपलब्ध चाऱ्याच्या साठ्या जवळ चूल,गॅस,कंदिल,अथवा स्टो,शेगडी इत्यादी पेटवू नये. वाळलेला चारा / कडव्याच्या गंजी व मुरघासच्या साठ्याजवळ उघड्या इलेक्ट्रिकच्या तारा (वायर) ठेवू नये.गंजी अथवा चाऱ्याच्या साठ्याजवळ इलेक्ट्रिक वायर असल्यास,एकतर त्या गंजीपासून दूर स्थलांतरीत कराव्यात आणि उघड्या असल्यास इन्सुलिन टेपनी व्यवस्थित बंदिस्त कराव्यात.जेणेकरून शॉर्ट सर्किट होवून,आग लागणार नाहीं.इलेक्ट्रिक वायरच्या खाली अथवा जवळ वाळलेला वारा/कडव्याच्या गंजी रचू नये व साठा करू नये.वाळलेला चारा / कडब्याच्या गंजीजवळ कोणासही बीडी,सिगारेट या सारख्या वस्तू पेटवू देवू नयेत.वाळलेला चारा / कडव्याच्या गंजी अथवा चाऱ्याच्या साठ्याजवळ कायमस्वरूपी वाळूने भरलेल्या बादल्या ठेवाव्यात.तसेच सद्यस्थितीत काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.अवकाळी पावसामध्येही मुरघास व चारा भिजणार नाही याची पशुपालकांना काळजी घ्यावी.कारण मुरघास अथवा चारा पावसात भिजल्यास, त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो.

शेतातील उभा हिरवा चारा अवकाळी पावसाने खाली पडल्यास,चारा उन्हामध्ये व्यवस्थित सुकू द्यावा आणि त्यानंतरच व्यवस्थित सुकलेला / वाळलेला चाऱ्याचा एकत्रित साठा करावा. ओला चारा एकत्रित साठवून ठेवू नये.कारण ओल्या चाऱ्यामध्येही बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो. त्यामुळे पशुधनास रोग प्रादुर्भाव होण्याची ही शक्यता असते.

राज्यात सद्यस्थितीत दुष्काळ व दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याने, उपलब्ध चाऱ्याची योग्य प्रकारे निगा राखणे आवश्यक आहे. पशुधनाच्या दृष्टीकोनातून चारा आवश्यक असल्याने आवश्यक ती दक्षता घ्यावी.असे आवाहन जिल्हयातील शेतकरी/पशुपालकांना जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी यांनी केले आहे.
*****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button