मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे जागतिक हिवताप दिन साजरा

धाराशिव दि.02(प्रतिनिधी) मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्षाचे घोषवाक्य ” ” हे आहे. त्याचे मराठी भाषांतर” मलेरियाविरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी गतिमान करुया लढा मलेरियाला हरविण्यासाठी ” असुन भविष्यात या आजराचा उद्रेक होवु नये म्हणुन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे माहिती जनतेमध्ये पोहचविण्यासाठी आरोग्य प्रदर्शन भरविण्यात आले. हिवताप व किटकजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती देवून जनजागृती करण्यात आली.यामध्ये आरोग्य प्रदर्शनाचा लाभ 510 नागरिकांनी घेतला.
आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुलकर्णी,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.मेडेकर,डॉ.श्रीमती दणके व शरद हिंगमीरे तसेच जिल्हा हिवताप कार्यालयाातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बांगर यांनी उपस्थितांना हिवतापाचे जनक सर रोनॉल्ड रॉस यांनी हिवतापाचे जंतुचा शोध लावला. हिवताप दिन का साजरा करण्यात येतो याबाबत माहिती दिली.त्यामुळे 25 एप्रिल हा दिवस हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे सांगीतले.हिवताप आजारासाठीची लक्षणे आढळुन आल्यास रक्ताची तपासणी नजीकच्या आरोग्य संस्थेत करुन उपचार घेणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन परिसर स्वच्छता व कोरडा दिवस पाळणे तसेच अबेट कार्यवाही करावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.मेडेकर यांनी किटकापासुन होणारे आजार हिवताप डेग्यु चिकुन गुनीया इतर आजाराविषयी माहिती दिली. हिवतापाचा प्रसार हा अॅनाफिलीस डासाचे मादीपासुन होतो याबाबत माहिती दिली.तसेच डासाचे जीवनचक्र,डास कसा तयार होतो. कोणत्या डासापासुन कोणता आजार होतो.पाण्यातील अळी/अंडी/कोप नष्ट करण्यासाठी अबेट (टेमेफॉस) चा वापर कशाप्रकारे केला जातो,डासांचे प्रमाण कमी होण्यासाठी घरामध्ये धुर फवारणी कशाप्रकारे केली जाते. डासापासुन सरंक्षण करण्यासाठी रासायनिक क्वॉईलचा व मच्डछरदाणीचा वापर करणे इत्यादी बाबत उपस्थितांना माहिती देवुन जनजागृती करण्यात आली.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मेंढेकर यांनी आरोग्य प्रदर्शनास आलेल्या उपस्थिंताचे व नागरिकांचे आरोग्य प्रदर्शनाचा लाभ घेतल्याबददल आभार मानले.