आपल धाराशिवताज्या बातम्या
छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय ; बारावी बोर्ड परीक्षेत कला शाखा ९५.१२ % तर विज्ञान शाखेचा निकालः १००%

धाराशिव :- (प्रतिनिधी):- , दि.२२ येथील छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिवच्या बारावी बोर्ड परीक्षेत कला शाखा ९५.१२ % तर विज्ञान शाखेचा निकालः १००% लागला असून विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
विज्ञान शाखेमध्ये प्रथम अनुजा पडवळ ८६.३३% , द्वितीय वीराक्षी रोहीले ८५.१७%, तृतीय अर्पिता सुरवसे ८४.३३% गुण घेऊन यश मिळविले आहे. विज्ञान शाखेतून परीक्षेसाठी १०४ विद्यार्थी बसले होते. यामध्ये २५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
तर कला शाखेतून प्रथम समीर शेख ८४. % , द्वितीय सायली शिंदे ७८.३३ %, तृतीय श्रावणी शिंदे ७६.१७ % गुण मिळवून यश संपादन केले आहे. ८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, शाळा समुहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.