भारतीय किसान संघ जिल्हा शाखा बीड चे एक दिवसीय अधिवेशन उत्साहात संपन्न

बीड | प्रतिनिधी :- भारतीय किसान संघाचे एक दिवसीय अधिवेशन वैष्णवी मंगल कार्यालय माजलगावं येथे दिनांक 22 जुलै 2024 रोजी उत्साहात संपन्न झाले. सर्वप्रथम कार्यकर्त्यांचा परिचय करून देण्यात आला नंतर पुढील तीन वर्षासाठी भारतीय किसान संघाची कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणी निवडणूक अधिकारी म्हणून प्रदेश संघटन मंत्री मा.दादा लाड यांनी काम केले. नंतर त्यांनी आपल्या ओघावत्या शैलीत जिल्हा कार्यकारिणीच्या कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन केले . संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा त्यांच्यात कोणते गुण असावेत? याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . यावेळी भारतीय किसान संघाचे प्रांत अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी ग्राम समितीचे कार्य, तालुका समितीचे कार्य व जिल्हा समितीचे कार्य कोणते? त्यांनी आपल्या संघटना वाढीसाठी कसे काम केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यकारणीची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली. बिड जिल्हाध्यक्षपदी तुकारामजी चोपडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने, दुसरे जिल्हा उपाध्यक्ष मदनजी नरवडे, जिल्हा मंत्री आप्पाराव यादव, सहमंत्री अशोकभाऊ तौर, कोषाध्यक्ष भीमसिंह शिंदे, सदस्य म्हणून प्रा. अशोक होके, श्रीहरी भापकर, बाबुराव हारजी राठोड, पांडुरंग चव्हाण, प्रकाश काका कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हाभरातून बहुसंख्याने कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.