आपल धाराशिव

भारतीय संविधान उद्देशिका वाचन व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन..

धाराशिव :-(प्रतिनिधी):- भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने दर महिन्यातील २६ तारखेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यान घेतले जाते,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने आकर्षक अशा बुध्द गुफा देखाव्यातील तथागताच्या ध्यानस्थ बसलेल्या भुमी स्पर्श मुर्तीस बाबा गुळीग व संजय गजधने, प्रदिप पांढरे यांच्या हस्ते पुष्प अर्पण व धुप लावुन वंदन करण्यात आले, भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.सध्या लोकसभेची निवडणुक लागली असुन मतदारांनी आपले अनमोल अशा मतदानातुन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,आपले एक मत देशाच्या विकासासाठी प्रदान करा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, निर्भयपणे मतदान करा असे आवाहन गणेश रानबा वाघमारे यांनी केले.यावेळी मतदार जनजागरण समितीचे गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने,बाबासाहेब गुळीग, प्रदिप पांढरे,आदिनाथ सरवदे,अतुल लष्करे,आविनाश नन्नवरे सह इतर उपस्थित होते.सुत्रसंचालन बाबा गुळीग यांनी केले तर आभार संजय गजधने यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button