लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळा (नि), ता.परांडा येथे जाहीर सभा संपन्न झाली..

परांडा :- (प्रतिनिधी):- गेली ५ वर्षे ज्यांना खासदार केले, त्यांनी संसदेत जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी काहीही केलेले नाही. खोटे बोलून, दुसर्या वर टीका टिप्पणी करून विकास होत नाही. आपल्या जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून ओळख पुसण्यासाठी महायुतीच सक्षम आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई पाटील यांना निवडून देत मा.मोदी साहेबांचे हात बळकट करावेत.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माजी उपाध्यक्षा तथा लोकसभेच्या उमेदवार सौ.अर्चना पाटील, माजी उपाध्यक्ष श्री.धनंजय सावंत यांनी खेड्या-पाड्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. या भागाची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी जी योजना राबविता येईल, ती राबवून जनतेचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काम करण्याची धमक सौ.अर्चनाताई पाटील यांच्यामध्ये आहे.त्यामुळे आता विरोधी उमेदवाराला घरी बसवून महायुतीच्या उमेदवाराला साथ द्यावी असे आवाहन पालकमंत्री ना.डॉ.तानाजी सावंत साहेब यांनी केले.
यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकुर साहेब, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख .दत्ता अण्णा साळुंके, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.