धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा

धाराशिव :- (प्रतिनिधी):- भुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-अमोल विक्रम धोत्रे, वय 23 वर्षे, रा.कैकाडीगल्ली भुम ता. भुम जि. धाराशिव हे दि.28.12.2024 रोजी 10.30 वा. सु. जुन्या जि.प.शाळेच्या पाठीमागे भुम येथेअंदाजे 8,100 ₹ किंमतीची 80 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे:आरोपी नामे-मंगल माणिक राठोड, वय 41 वर्षे, रा.खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.28.12.2024 रोजी 20.45 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर अंदाजे 2,200 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-शालन बापु काळे, वय 48 वर्षे, रा.आठवडी बाजार मैदान कळंब ता. कळंब जि. धाराशिव या दि.28.12.2024 रोजी 20.30 वा. सु. आठवडी बाजार मैदान कळंब येथेअंदाजे 5,600 ₹ किंमतीची 70 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-विलास शामराव मडके, वय 54 वर्षे, रा.मोहा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.28.12.2024 रोजी 20.45 वा. सु. प्रा.आ. केंद्राचे बाजूस मोहा येथे अंदाजे 6,300 ₹ किंमतीचे 180 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत