आपल धाराशिवताज्या बातम्या

आश्वासनांच्या पुर्ततेसाठी पत्रकारांचा पाठपुरावा आवश्यक आ. कैलास पाटील यांचे प्रतिपादन, जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने १४५ जणांची तपासणी

धाराशिव : (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील विकासाबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे आश्वासने देतात. परंतू ते अनेकदा पूर्ण होत नाहीत. त्याची पुर्तता होण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी या आश्वासनांचा पाठपुरावा बातमीच्या माध्यमातून करायला हवा,अशी अपेक्षा विधिमंळडात मंत्र्यांनी व्यक्त करून आपल्या जिल्ह्याची केवळ नकारात्मक बाजू मांडण्यापेक्षा सकारात्मक बाजूही पुढे याव्यात,असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले.
धाराशिव जिल्हा पत्रकार संघ व पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या वतीने पत्रकारांसह त्यांच्या कुटूंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सोमवारी (दि.६) घेण्यात आले. दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, पल्स हॉस्पीटलचे डॉ.तानाजी लाकाळ, डॉ. रणजित कदम आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कमलाकर कुलकर्णी, देविदास पाठक, महेश पोतदार, डॉ.कुलदीप सस्ते, डॉ.परितोष कुरुंद, डॉ.नितीन भोसले, डॉ. पवन महाजन, डॉ.बालाजी लोमटे, डॉ.सौरभ खोमणे, डॉ. विजय मुंदडा, डॉ.श्रीमती किरण इंगळे, पल्स हॉस्पीटलचे व्यवस्थापक स्वप्निल सोकांडे आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व भगवान धन्वतंरीचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या कामावर बातमीच्या माध्यमातून पत्रकारांचे लक्ष असते. जनतेच्या विविध समस्या पत्रकार निदर्शनास आणून देतात. त्यामुळे अनेक समस्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अवगत होतात त्यातून सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होते. परंतू पत्रकारीतेचे कर्तव्य बजावताना स्वत:सह त्यांच्या कुटूंबाच्या शारीरीक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पत्रकार संघ व पल्स हॉस्पीटलने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यापुढे शारीरीक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य मिळण्यासाठी समुपदेशन करता येईल का याचा विचार करावा.
या आरोग्य तपासणी शिबिरात मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, ईसीजी, हाडांंची तपासणी,डोळे तपासणी,महिला,लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४५ पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रसेन देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन महेश पोतदार तर आभार देविदास पाठक यांनी मानले. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार जी. बी. राजपूर, राजाभाऊ वेद्य, संतोष हंबीरे, प्रशांत कावरे, धाराशिव तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, भूम तालुकाध्यक्ष प्रल्हाद आडागळे, सयाजी शेळके, धाराशिव तालुका उपाध्यक्ष सुधीर पवार, सचिव शितलकुमार वाघमारे, कोषाध्यक्ष किशोर माळी, सदस्य आकाश नरोटे, शिवराजसिंह गव्हाणे, संजय शिंदे, राजवर्धन भुसारे, हेदरअली पटेल, प्रशांत सोनटक्के, शुक्राचार्य शेलार, विशाल जगदाळे, मनोज मोरे, प्रा.अभिमान हंगरकर, सज्जन यादव, अझहर शेख, इस्माईल शेख, राहुल कोरे, आरिफ शेख, सतीश मातने, अमजद सय्यद, बाळासाहेब माने, रियाज शेख आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button