कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प : *उपसा सिंचन योजना क्र.२ अंतर्गत टप्पा क्र.५ सिंदफळ ते रामदरा चाचणी नियोजन

धाराशिव,दि.२२ (प्रथिनिधी):- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. २ मधील टप्पा १ ते ५ (घाटणे ते रामदरा) मधील प्रथम टप्पातील ७ अ.प.पू. मर्यादेतील कामे ही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीपथावर आहेत.या योजनेचा लाभ हा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर,उमरगा व लोहारा या तालुक्यांना होणार आहे.याद्वारे १० हजार ८६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या उपसा सिंचन योजना क्र.२ अंतर्गत टप्पा क्र.५ सिंदफळ ते रामदरा चाचणी नियोजन करण्यात आले आहे.कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत
टप्पा क्र. १ ते ५ मधील स्थापत्य विद्युत व यांत्रिकी कामे ही अंतिम टप्यात आहे.यापैकी टप्पा क्र.२,३ व ५ ची कामे जवळपास पूर्ण झालेली आहे.टप्पा क्र.१ व ४ ची उर्वरित कामे ही पुढील ८ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्यस्थितीत जोडणी केलेली विद्युत व यांत्रिक उपकरणे हे व्यवस्थितरीत्या कार्यान्वित झालेले असल्याची खातरजमा करण्यासाठी पंपाची चाचणी ही टप्पाटप्प्याने घेणे अपेक्षित आहे.त्यानुसार काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत योग्य उपाययोजना करणे या नियमित स्वरूपाच्या चाचणीचे नियोजन हे जलसंपदा विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
सध्यस्थितीत टप्पा क्र.५ सिंदफळ ते रामदरा या टप्प्याची चाचणी येत्या काही दिवसात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.त्यानंतर जसजशी कामे पूर्ण होतील तसतशी उर्वरित टप्प्याच्या चाचण्या घेण्याचे नियोजन आहे.सध्यस्थितीत होणाऱ्या टप्पा क्र.५ सिंदफळ ते रामदरा या टप्प्याकरिता सिंदफळ साठवण तलावातील पाण्याचा वापर करून हायड्रोलिक चाचणी करण्याचे नियोजन आहे.सिंदफळ साठवण तलावाची एकूण साठवण क्षमता १९६७ दलघमी असून टप्पा क्र.५ ची चाचणी करणेसाठी ०.०२५ दलघमी एवढ्या पाण्याचा वापर होणार आहे. हे पाणी एकूण क्षमतेच्या सर्वसाधारण १ टक्के इतके अत्यल्प आहे.सिंचन व्यवस्थापन विभागाकडील उपलब्ध माहिती व मागील काही वर्षातील पाणीसाठ्याचा विचार करता दरवर्षी साधारणपणे ८-१० टक्के पाणी हे हंगामाच्या अखेरीस तलावामध्ये शिल्लक राहते.त्यानुसार या चाचणीमुळे सिंदफळ साठवण तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकन्यांच्या दरवर्षी होणान्या सिंचनावर व तलावाच्या साठवण क्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही याची खबरदारी घेवून ही चाचणी नियोजित करण्यात आलेली आहे.अशी माहिती कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता श्री.नाईक यांनी दिली.