डोंबिवलीच्या ब्लास्ट मध्ये आठ जणांचा मृत्यू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींच्या भेटीला

मुंबई:- (प्रतिनिधी):- डोंबिवली एमआयडीसीमधल्या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 64 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, यानंतर ते जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले.केमिकल रिएक्टरचा स्फोट झालाय, या स्फोटाची तीव्रता मोठी होती, काही लोक अडकले आहेत’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
‘स्फोटाच्या तीव्रतेमुळे 8 जणांचा मृत्यू जाला आहे. रेस्क्यू करण्याला प्राधान्य आहे. कंपन्यांचे एबीसी वर्गीकरण होणार आहे. तसंच रेड कॅटेगरीमधील युनिट बंद होणार आहेत. हायली हजारडस तीव्रतेची युनिट बंद केली जातील, तसंच या स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
जीवितहानी कॉम्प्रोमाईज केली जाणार नाही. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मानवी वस्तीमध्ये हजारडस युनिट ठेवलं जाणार नाही. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींच्या उपचारांचा खर्च शासन करेल’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सोनारपाडा या ठिकाणी गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या अमुदान या केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की दोन किमीपर्यंत याचे हादरे जाणवले. विशेष म्हणजे एकामागून एक असे तीन स्फोट झाल्याची माहिती मिळाली. स्फोटानंतर अमुदान कंपनीत भीषण आगडोंब उसळला.
थोड्या थोड्या वेळानं छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू येत होते. या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसरातील साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरला. हे स्फोट इतके भीषण होते की आसपासच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. डोंबिवली एमआयडीसीपासून लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे पाहायला मिळाले.दुपारच्या स्फोटानंतर सायंकाळपर्यंत एमडीसीत आगडोंब उसळत होता.