तुळजापूर शहरातील अनेक असुविधेबाबतचे उपोषण नगर परिषद च्या आश्वासनानंतर तुर्तास स्थगित मुदतीत मागणी पुर्ण न केल्यास आंदोलन तिवृ करण्याचा दिला इशारा

तुळजापूर (प्रतिनिधी):- तुळजापूर महाविकास आघाडी व इतर घटक पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख मागण्याबाबत लाक्षणिक उपोषणास बसले होते, यावेळी नगरपरिषदेच्या वतीने सर्व मागण्या पुर्ण करण्याचे लेखी पत्रान्वये कळवून तसे आश्वासन दिले असल्याने, सदरील उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले.
शहरातील प्रचंड अस्वच्छता, विस्कळीत ड्रेनेस व्यवस्था, शहरातील बंद पडलेली लाईट व्यवस्था, अंधाराचे साम्राज्य, शहरातील विस्कळीत समतोल पाणीपुरवठा, हुतात्मा स्मारकते पावणारे गणपती रस्ते होणेबाबत, शहरातील अतिक्रमण हटविणे, भाजी मंडई दररोज रस्त्यावर भरते त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था करणे अशा विविध मागण्यासाठी तुळजापूर शहरातील महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते, तसेच शहरातील नागरिक व व्यापारी समूह पुजारी वर्ग इत्यादींच्या वतीने महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकते, सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते, तसेच शहरातील नागरिक व व्यापारी समूह, पुजारी वर्ग यांच्या स्वाक्षऱ्यासह रितसर निवेदन देण्यात येवून सर्वांच्या उपस्थितीत दि. 21 (मंगळवारी) सकाळी 10.30 वाजता नगरपरिषद तुळजापूर कार्यालयासमोर शहरातील प्रमुख मागण्याबाबत लाक्षणिक उपोषणास बसले होते, यावेळी नगरपरिषदेच्या वतीने सर्व मागण्या 15 दिवसात पुर्ण करण्याचे लेखी पत्रान्वये कळवून तसे आश्वासन दिले असल्याने, सदरील उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले. परंतु नगरपरिषेदेने मुदतीत सदरील मागण्या पुर्ण न केल्यास आंदोलन तिवृ करण्याचा इशाराही यावेळी तुळजापूर महाविकास आघाडी व इतर घटक पक्षाच्या वतीने देण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकते, सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते, तसेच शहरातील नागरिक, व्यापारी समूह व पुजारी वर्ग आदी मोठया संख्येने उपस्थित होते.