तुळजापूर शहराच्या विकासाच्या नावाने बोंबाबोंब ! अमोल कुतवळ

तुळजापूर:- (प्रतिनिधी):- तुळजापूरकरांनो सावधान तुळजापूर शहरातील गेली पाच वर्षापासूनच्या इतिहासात आमदार राणा पाटील यांनी मंदिर संस्थानाविषयी घेतलेले निर्णय पुजारी व व्यापारी विरोधी घेतलेले निर्णय मंदिरामध्ये पुजारी बांधवांसाठी आणलेली बंदी म्हणजे पुजारी यांना एकाच गेटमधून प्रवेश ? तसेच अभिषेक पन्नास रुपया वरून पाचशे रुपये केले? दर्शन मंडपात कोणालाही विश्वासात न घेऊन स्वतःची हुकुमशाही चालवली? तसेच नवरात्र उत्सवात आंदोलन करून शहर बंद ठेवावे लागले ?विकासाच्या नावाखाली मोठी घोषणा करून आरादवाडी येथे 500 गाळे काढून स्वतःची घरे भरली आहे असा प्रश्न अमोल कुतवळ यांनी उपस्थित केला.तसेच आरादवाडी येथील गोरगरीब लोकांना विस्थापित करून त्यांना उघड्यावर आणण्यात आले.शुक्रवार पेठ भागातील लोकांना पार्किंग, नवे भक्तनिवास काढून नारळ फोडून तुळजापूर शहरातील नागरिकांना फसविण्यात आले. तसेच मंदिर संस्थांचे पैसे धाराशिव जिल्हा परिषद शाळेच्या नावाने चोरण्यात आले. शहरांमधील लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंड नाही? तुळजापूर शहरात सार्वजनिक शौचालय नाहीत ?तसेच पार्किंग मध्ये सुविधा नाहीत ? परंतु पार्किंग कर वसूल मोठ्या प्रमाणा वर केला जातो. गेली पाच वर्षात राज्यात व केंद्रात सरकार असतानाही तुळजापूर तालुक्यात कोणताही व्यवसाय उद्योग आणला नाही? असा सवाल तुळजापूर तालुक्यातील व शहरातील नागरिकातून सवाल व्यक्त होत आहे. गेली पाच वर्ष राणा पाटील हे विकासाच्या नावाखाली तुळजापूर तालुक्याची व तुळजापूर शहर वासियांची फसवणूक केली गेली आहे ?तसेच त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला आमदार राणा पाटील यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप धीरज आप्पासाहेब पाटील हे बहुमतांनी विजयी होतील असे अमोल कुतवळ यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले आहे.