प्रजासत्ताक दिनी* *पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा होणार सन्मान

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी):- ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदान क्रमांक २ येथे सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे.ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री.सरनाईक हे उपस्थितांना संबोधित करुन शुभेच्छा देतील.
त्यानंतर पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानीत करणार आहे. महसूलविषयक कामकाजांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महसूल सहायक सुवर्णा पतंगे,माहिती तंत्रज्ञान विभाग (ई-गव्हर्नन्स) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पोदे, क्रीडा क्षेत्रात विजय शिंदे (खो-खो), संपदा मोरे (खो-खो) या गुणवंत खेळाडूचा,दिनेश जाधव (खो-खो) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व प्रा.डॉ चंद्रजीत जाधव (खो-खो) यांच्या मार्गदर्शनाबद्दल,जिल्हा उद्योग केंद्राकडून प्राची केमीकल्सचे किशोर धारुरकर यांना प्रथम पुरस्कार, सिध्देश्वर बेकर्सच्या श्रीमती जयश्री शिंदे यांना व्दितीय पुरस्कार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्याकडून धाराशिव तालुक्यातील भडाचीवाडी येथील शेतकरी महेश बोबडे,तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी येथील शेतकरी किरण गंधारे व सुधाकर गंधारे,कळंब तालुक्यातील सौदान ढोकी येथील सतीश लोढे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सन २०२४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५ अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हवालदार नितीन पोतदार,पोलीस अंमलदार विशाल बिंदे,सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे, विभागीय वन अधिकारी कार्यालयातील लिपिक केतन पडवळ,पोलीस अधीक्षक कार्यालयातील श्रीमती ऋृतीका हजगुडे यांना विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्कार मिळाल्याबद्दल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शंकर खुने यांचा,मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाराशिवचे सोमनाथ गायकवाड यांचा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात येणार आहे.
****