आपल धाराशिवताज्या बातम्या
पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार* *बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन*

धाराशिव दि.६ (प्रतिनिधी):- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आज ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यालयातील कर्मचारी नंदू पवार, चित्रा घोडके,अनील वाघमारे,श्रीकांत देशमुख व युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रमोद राऊत उपस्थित होते.उपस्थितांनी देखिल प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.