महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांचा वाढदिवस जिल्हाभरात समाज उपयोगी उपक्रमाने उत्साहात साजरा…

धाराशिव:- (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, प्रदेश सचिव गोकुळ तात्या शिंदे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये देवी तुळजाभवानी ची महाआरती व महाअभिषेक करून मिठाईचे वाटप करण्यात आले. हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा, धाराशिव – उस्मानाबाद येथे चादर चढविण्यात आली. त्याचप्रमाणे गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड तुळजापूर तालुकाध्यक्ष बबलू भैय्या सूर्यवंशी धाराशिव शहराध्यक्ष सचिन भैय्या तावडे, तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार, जिल्हा उपाध्यक्ष पंकज स्वामी,प्रशांत नवगिरे, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष संदीप भैय्या गंगणे,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख, धाराशिव शहर कार्याध्यक्ष अकबर खान पठाण, सोशल मीडिया सुहास मेटे,तुळजापूर तालुका सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष विनोद जाधव, धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, धाराशिव अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष सरफराज सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली असून या योजनेचे फार्म भरून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष अमिना शेख यांच्या नेतृत्वाखाली तसेच अल्पसंख्यांक महिला शहर कार्याध्यक्ष निलोफर सय्यद,उपाध्यक्ष सना शेख, सरफराज सय्यद यांच्या सहकार्याने आज जिल्हा कार्यालय धाराशिव उस्मानाबाद येथे शिबिर घेण्यात आले. उपस्थित महिलांना जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.या नंतर सुद्धा महिलांचे फार्म भरून घेतले जातील व त्यांना पुढील काळात ही सहकार्य राहील सदैव त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव सोबत असेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष महेंद्र गागा दुर्गुडे यांनी व्यक्त केला. या शिबिरामध्ये शहरातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिला यांनी आदरणीय दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मा. श्री. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर तालुका युवक कार्याध्यक्ष. श्री समाधान ढोले यांच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळा येवती. ता तुळजापुर. येथे पारस बाग तयार करण्यात आली आणि रोपे वाटप करत आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय ना.श्री.अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पै.श्री.नवनाथअप्पा जगताप यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे रुग्णांना बिस्किटे व फळे वाटप नंतर हजरत ख्वाजा बदरोद्दीन रहे. यांच्या दर्गाह वर चादर अर्पण करून त्यालगत असणाऱ्या मदरसा येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. नंतर, आपला आधार वृद्धाश्रमास पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम हन्नूरे, परंडा तालुका अध्यक्ष अमोल काळे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब बारस्कर, विजय पाटील, तालुका युवक अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, युवक परंडा शहराध्यक्ष शुभम पाटील, दाऊद शेख, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष गणेश सांगोळे, माऊली वारे, सतु काका, कैलास झिरपे, शिवाजी व्यवहारे, सामाजिक न्याय शहराध्यक्ष भाग्यवंत शिंदे, लहू डाखवाले, शंकर खैरे, चंद्रकांत जगताप, परंडा शहराध्यक्ष जावेदभाई पठाण, धर्मराज गटकुळ, अश्रू नलावडे, सिद्धेश्वर जाधव तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडो च्या संख्येने उपस्थित होते.कळंब येथे उपजिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर महिला जिल्हाध्यक्षा सरला ताई खोसे यांच्या वतीने शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या व इतर साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव,कळंब तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे, महिला जिल्हाध्यक्ष सरला ताई खोसे, तालुका उपाध्यक्ष अगतराव कापसे,किसान सेल जिल्हा अध्यक्ष प्रकाश बावणे, युगप्रतिश सरचिटणीस शंतनू खंदारे, कळंब शहराध्यक्ष दत्ता तनपुरे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष उदय चंद्र खंडागळे कळंब विधानसभा कार्याध्यक्ष गणेश भोसले आदी सहकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भूम तालुका अध्यक्ष ॲड.रामराजे साळुंके यांचे वतीने मूक बधिर शाळेतील मुलांना फळे व खाऊ वाटप करून जन्म दिवस साजरा करण्यात आला या वेळी शहर अध्यक्ष जीवन गाढवे, ओ बी सी सेल तालुका अध्यक्ष अभिजित वणवे, युवक अध्यक्ष दादा निर्फळ,अनिस धस उपाध्यक्ष अभिजित हुंबे, कार्यध्यक्ष दीपक कुटे, अशोक साळुंके, निखिल काळे,धनाजी पाटूळे व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.अणदूर येथे विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच अंगवणवाडीतील लहान मुलांना तसेच जिल्हा परिषद शाळेत फळे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे स्वागत करून शाळेच्या मुख्याध्यापक दराडे मॅडम , बनसोडे सर , अराध्वड सर , बोंगरगे मॅडम काजल मॅडम, गिरी सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष मलंगभाई शेख यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास युवक जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब आलूरे, समीर नदाफ , बसु भंडारकवठे , दिनेश बंदपट्टे , मोहम्मद शेख , सुलतान शेख , ऋषिकेश धोत्रे , प्रशांत अलकुंटे, किरण धोत्रे आदी जणांनी कार्यक्रम यशस्वी केला.सदर जिल्ह्यामध्ये येणारा आठवडा अजित पर्व सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असून आज सामाजिक उपक्रमाने सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.