संतप्त नागरिक, पालक डी-मार्टसमोर करणार गुरुवारी रास्तारोको आंदोलन

कळवून सुध्दा त्यांनी चुकीच्या पध्दतीने हे नियमबाह्य काम सुरु ठेवले आहे. व त्यास जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत आहे. त्यामुळे सदर क्षेत्रामधील आजू-बाजूचे सर्व नागरीक त्रस्त झाले आहेत व चिंतेत आहेत. त्यातच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने सर्व नागरिक विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात आक्रोश करीत आहेत.
तरी जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष देवून नियमानुसार शहरातील होणार्या संपूर्ण सर्विस रोडची रुंदी कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच डी मार्ट समोर होणारा सर्विस रोड तात्काळ पूर्ण करून पोदार शाळेजवळ विकास नगर येथे व जुना उपळा रोड येथे लहान चार चाकी वाहने जातील असे प्रत्येकी एक असे एकूण दोन अंडरपास द्यावेत. अन्यथा सदरच्या नियमबाह्य कामामुळे तेथे होणार्या अपघातांना व जिवीतहानीस संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहतील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी. तसेच दिनांक 10 डिसेंबर रोजी डी मार्ट समोर झालेल्या अपघातामध्ये पोदार शाळेतील एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्या सर्व संबंधित यंत्रणेवर/व्यक्तींवर तात्काळ कारवाई होऊन न्याय मिळावा म्हणून आम्ही शहरातील सर्व नागरिक/पालक दिनांक 12 डिसेंबर रोजी डी मार्टसमोर दुपारी 4 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार आहोत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर खलील सय्यद, प्रविण कोकाटे, मामा बागल,सुरेश गवळी, गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, प्रेमानंद सपकाळ, श्रीकांत भुतेकर, विश्वेश्वर चपने, नंदकिशोर पाटील, प्रदीप घुटे-पाटील, रमेश ढवळे, अॅड. जावेद काझी, साबेर सय्यद, सोमनाथ गुरव, शहाजी भोसले, श्याम जहागीरदार, सिद्धेश्वर कोळी, रवी वाघमारे नंदकुमार माने, श्रावण जांगीड, सुरज भुतेकर, गणेश साळुंके, बंडू आदरकर, कलीम कुरेशी, अमित महंकाळे, अविनाश अंधारे, अॅड.राकेश कचरे, अनुप लोखंडे, पृथ्वीराज मोरे, अमित जगधने, प्रसाद देशमुख, बाबा मुजावर, कादर खान, आयाज शेख, एजाज काझी, इस्माईल शेख, वाजीद पठाण, गणेश राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील, औदुंबर पांचाळ, बिलाल तांबोळी, विजय मक्रुवार, प्रवीण पवार, मिलिंद पेठे, बालाजी साळुंके, कुणाल निंबाळकर, गजानन खर्चे-पाटील, राघवेंद्र देशपांडे, गोविंद कसपटे, दत्तात्रय पवार, प्रशांतबापू साळुंके, शिवाजी पौळ, पांडुरंग रोहिदास, सुनील वाघ, पंकज पाटील व इतर पालक, नागरिकांची स्वाक्षरी आहे.