आपल धाराशिवताज्या बातम्या
उमरगा येथील रोडच्या बाजूला उभे असलेले व्यक्तीला अज्ञात वाहनाची धडकेत उपचाादरम्यान मृत्यू

धाराधिव:- (प्रतिनिधी):- उमरगा पोलीस ठाणे : मयत नामे- योगेश इंद्रजित गंलाडे रा.भगतवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.24.04.2024 रोजी 06.00 वा. सु. मोटरसायकल नारंगवाडी येथे रोडलगत उभा करुन साईडला थांबले असता अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजीपणे चालवून योगेश गंलाडे यांना धडक दिली. या अपघातात योगेश गंलाडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच अज्ञात वाहन चालक हा अपघात करुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-इंद्रजित बाजीराव गंलाडे, वय 52 वर्षे, रा. भगतवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.22.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), सह 134(अ)(ब), 184 मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.