धाराशिव येथे राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन

धाराशिव:- (प्रतिनिधी):- महाराष्ट्र द्वेशी अर्थसंकल्पाविरोधात व्यक्त केला निषेध, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केंद्र सरकारने देशाचा अर्थसंकल्प सादर केला. परंतू देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसला नाही, महाराष्ट्र द्वेशी अर्थसंकल्प असून याविरोधात राष्टÑवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयासमारे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, काल केंद्र सरकारने देशाचा अर्थसंकल्प सादर केला. परंतू देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसला नाही, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. कारण या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ठोस निधी दिलेला दिसत नाही. परंतू भाजप प्रणीत आंध्र प्रदेश व बिहार राज्यांना दिलेली लक्षणीय मदत महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करणारा आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्यावरील अन्याय सहन करणार नाही. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, दलीत, मागास, भटके, अल्पसंख्यांक या सर्वांना हा अर्थसंकल्प महाराष्ट्रावर अन्याय करणारा वाटतो आहे. त्यामुळेच केंद्र सरकारचा राष्टÑवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर, नरदेव कदम, मेजर सावंत, डॉ. ताडेकर, भारत शिंदे, सागर चिंचकर, बिलाल शेख, इकबाल पटेल, गौतम क्षिरसागर, शाम पाटील दुधगावकर, श्रीकांत धाबेकर, राहुल धाबेकर, दौलत गाढवे, औदुंबर धोंगडे, शंकर कदम, संभाजी धोंगडे, रामराजे धोंगडे, परमेश्वर येवले, बाबासाहेब धोंगडे, महादेव धोंगडे, प्रमोद तौर, दत्ता धोंगडे, किशोर आवाड, आप्पासाहेब आवाड, हनुमंत आवाड, प्रदिप काळदाते, अशोक काळदाते, उत्रेश्वर काळदाते, गणपत भोसले, गणेश काळदाते, शिवाजी अंकुशे, सतिश काळदाते, दामोदर काळदाते, नरदेव कदम, उत्तम नरमाळे, नामदेव लोमटे, व्यंकट इरोदे, गौतम क्षिरसागर, युवराज सुरवसे, भागवत भंडारकर, आकाश चौरे, नरसिंग बुटूकडे, विलास सरवदे, बाळू सरवदे, कैलास उंबरे, सोमनाथ उंबरे, गणपती चव्हाण, बाळू उंबरे, पोपट सरवदे, सुधाकर सरवदे, विलास सरवदे, हनुमंत उंबरे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.