मंदिर संस्थानाचे तहसीलदार माळी यांची तत्काळ उचबांगडी करा ?

तुळजापूर :- (प्रतिनिधी):- तुळजापूर गणेश पाटील – भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी निवेदनाद्वारे केली मागणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कार्यरत तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या गैरकारभारामुळे तत्काळ त्यांची उचल बांगड़ी करण्या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी (दि. २४) रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे.की श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्रची कुलस्वामिनी असून येथे दर्शनासाठी महाराष्ट्र सह कर्नाटक, आंध्रा, तेलंगाना येथील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्हीआयपी पासेस ची मागणी होत असते. या गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत व भविष्यात त्यांच्याकडून भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मंदिर संस्थांचे तहसीलदार माळी हे मंदिरामध्ये मनमानी कारभार करून गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.राजकीय ढाच्यांना हाताशी धरून ते मनमानीपणे व्हीआयपी पासेस मोफत वाट्प केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच त्यांना बरेच वेळा फोन केल्यास ते फोन न घेता पीआरओ यांच्याशी संपर्क साधण्याचा मेसेज टाकत असतात. तहसीलदार माळी है धाराशिव जिल्ह्यातील असून त्यांचे
गाव तुळजापूर पासून जवळच असल्यामुळे त्यांचा राजकीय लोकांशी
पूर्वीपासून हीत संबंध असल्याचा गैरफायदा उचलत आहेत. त्यामुळे
तुळजाभवानी मंदिर संस्थान तहसीलदार माळी यांची पदावरून उचल
बांगडी करावी. तसेच त्यांनी मंदिर संस्थानाचा पदभार घेतल्यापासून
केलेल्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंदिरात
होणारा भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यात यावे, अरशीही या निर्वेदनात शेवटी नमूद करण्यात आले आहे. सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे.