आर टी ई प्रवेश निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्या मुळे प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबवा

धाराशिव :- (प्रतिनिधी):- अन्यथा शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात तीव्र आंदोलन छेडणार – अनुराधा लोखंडे ,वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धाराशिव
शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच प्रवेशा संदर्भात निकष जाहीर केले. त्यामध्ये सदर विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न, घर व शाळा यातील अंतर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची अट रद्द असे नियम आहेत. या निकषाच्या अधीन राहून प्रवेश होणे अपेक्षित होते. परंतु सदर प्रवेश प्रक्रियेत असे दिसून आले नाही .याठिकाणी सावळा गोंधळ झाल्याचे दिसत आहे .
मात्र दिनांक 20 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत मात्र नियमबाह्य प्रवेश दिसून आले. कमी अंतरावरील अर्जांचा येथे विचार केलेला दिसून येत नाही या उलट जास्त अंतराचे अर्ज हे प्रथम क्रमांकावर ती आलेले दिसून येत आहेत.यामुळे गरजवंत विद्यार्थी प्रवेशा पासून वंचित राहिले आहेत . अश्या गलथान प्रक्रियेचा आम्ही वंचित बहुजन महिला आघाडी कडून निषेध करत आहोत .आपल्या कडून प्रवेश प्रक्रिया तुरंत थांबवावी व आपण आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून तुरंत न्यायिक पद्धतीने हा प्रश्न मार्गी लावावा .अन्यथा आम्ही शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात तीव्र आंदोलन छेडणार आहोत. याची नोंद घ्यावी. अश्या मजकुराचे निवेदन जिल्हाधिकारी ,व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.